आरमोरी तालुक्यात गोडाऊन उपलब्ध न झाल्याने ही धान्य खरेदी ३० मार्च पासून बंद झालेली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३१ मार्च: आरमोरी तालुक्यात फेडरेशन महामंडळ अंतर्गत धान खरेदी ही ३१ मार्चपर्यंत सुरू होती. मात्र आरमोरी तालुक्यात गोडाऊन उपलब्ध न झाल्याने ही धान्य खरेदी ३० मार्च पासून बंद झालेली आहे.
चालू आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२१ पर्यंत सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे धान खरेदी मुदत होती यावर्षी महाविकास आघाडी सरकार ने धान खरेदी करिता किचकट प्रक्रियाचा अवलंब केला. त्यामुळे महामंडळ यांना खूप त्रासाचा सामना करावा लागला व जिल्ह्यात यावर्षी गोडाऊनची उपलब्धता होऊ शकली नाही. अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी आपला धान विक्री करण्यापासून वंचित राहिले आहेत व सध्या जिल्ह्यातील शेतकरी धान विक्री करू न शकल्यामुळे हवालदिल झाले.
हजारो शेतकऱ्यांनी आपले धान विक्री करिता सात बारा घेऊन ऑनलाईन नोंद करून धान विक्री करिता वाट बघत आहेत. स्थानिक आरमोरी येथील खरेदी विक्री समिती यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य खरेदी करण्याकरीता सुरुवात केली. त्यानुसार अनेक टोपण धारक शेतकऱ्यांनी आपले धान ट्रॅक्टर भरून आणले. मात्र या दोन दिवसाच्या कालखंडामध्ये त्यांच्याकडे पुन्हा गोडाऊन उपलब्ध नसल्याने धान विक्री बंद झाली. कोरोनाचा सावट संपूर्ण जिल्ह्यात असून तोरणाची नियम पाळता दररोज २० ते २५ शेतकऱ्याचे धान खरेदी होत होती आणि गर्दी न करता चालू स्थितीत शेतकऱ्याचे धाम घेणे सुरू होते. मात्र गोडाऊन पूर्ण झाल्यामुळे आता धान खरेदी करायची कुठे असा प्रश्न निर्माण खरेदी-विक्री समितीला झाला.
त्यामुळे जवळपास दोन ते तीन दिवसापासून धान खरेदी केंद्र बंद झालेले आहे. उरलेले पंचवीस ते तीस ट्रॅक्टर धान शेतकऱ्यांनी आपले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणून ट्रॅक्टर उभे केलेले आहेत. या शेतकऱ्यांची धान खरेदी न झाल्यास या शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. कुणाचे किरायाने आणलेली ट्रॅक्टर मधले धान आहेत तर कुणी इतर साधनांनी किराया करून आणलेले वाहन आहेत. मात्र तीन ते चार दिवसांपासून या लोकांचे ट्रॅक्टर बाजार समितीच्या आवारात उभे आहेत. खरेदी-विक्री समितीच्या पदाधिकाऱ्यांना विचारले असता ३१ तारखेपर्यंत खरेदीची मुदत होती. आज दिनांक ३१ मार्च रोजी प्रत्यक्ष जाऊन बघितले असता अजूनही ते ट्रॅक्टर त्या आवारात उभे आहेत. मात्र या अनेक शेतकऱ्यांचे धान हे अजून पर्यंत घेण्यात आलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेवटी धान विक्री पासून वंचित राहावे लागणार आहे. यासाठी शासनानेही धान खरेदीची मुदत कोरोनाच्या संकटाचे नियम आणि अटी यानुसार या शेतकऱ्यांचे तात्काळ धान खरेदी करण्यासाठी ३१ एप्रिल पर्यंतची मुदत वाढविण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.