लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आरमोरी: महाराष्ट्र शासनाने सुगंधीत तंबाखु विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला असतांना सुध्दा गडचिरोली जिल्हयात मोठया प्रमाणात सुगंधीत तंबाखुची विक्री व वाहतुक करणायावर अंकुश बसावा या उद्देशाने आरमोरी हद्दीतील आरमोरी, वैरागड, देऊळगाव, वडधा, ठाणेगाव, मानापूर, अरसोडा, बर्डी, वघाडा, जोगीसाखरा व अंतरंजी या गावांमधील शाळापासून 100 मी. जवळ असलेल्या तसेच गावाच्या मुख्य रस्त्यावर असलेले पानटपरी (पानठेला) तसेच दुकानामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले सुगंधित तंबाखू विक्रीसाठी ठेवत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने तपासणी केली.
सुगंधित तंबाखू मिळून आल्याने नमुद गावातील 40 पानटपरी (पानठेला) तसेच दुकानदार यांच्यावर The Cigarettes & Other Tobacco Products Act 2003 (COTPA) या कायद्यांंतर्गत कारवाई करुन प्रत्येकी 200 रु प्रमाणे एकुण 8000/ रु. दंड वसुल करण्यात आला. तसेच त्यांना आपल्या पानटपरी (पानठेला) व दुकानात सुगंधित तंबाखू न विकण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरी पोलीस निरीक्षक कैलाश गवते यांच्या नेतृत्वात पोउपनि. नरेश सहारे, पोउपनि दिलीप मोहुर्ले, देवराव कोडापे, गौरकार, पोहवा गोन्नाडे, पिल्लेवारन, कुमरे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.