राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूरात आगमन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर, 12 एप्रिल :-राज्यपाल रमेश बैस यांचे आज येथील नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने दिल्लीहून आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यंवशी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विशाल आनंद यांनीही राज्यपालांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. गुरूवार दिनांक १३ एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११० व्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल उपस्थित राहणार आहेत.

हे पण वाचा :-