लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यापासून अवघ्या दिड किमी अंतरावर असलेल्या कोचीनारा गावात काल सोमवारी झालेल्या कोवीड-१९ लसीकरणात तब्बल २२० जणांनी लस घेतली आहे.
बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहीम हाती घेऊन लोकांशी भेटीगाठी घेऊन त्यांचे मन वळविले. कोचीनारा सह जांभळी ७७, कोहका ४४, हुडूकदुमा १२, आणि बेतकाठी १० असे एकुण ३६३ लोकांनी एकाच दिवशी लस घेतली.
लसीकरण बाबतीत जिल्ह्याचे सीईओ कुमार आशिर्वाद यांनी दि. २ जून ला तहसील कार्यालय कोरची येथे तालुक्यातील सरपंच, ग्रा. पं. सदस्य, पोलीस पाटील, बचतगट व महिला गटाच्या पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, महाग्रामसभेचे पदाधिकारी, पत्रकार आणि तालुक्यातील अधिकारी यांची संयुक्त सभा घेऊन लसीकरण बाबतीत च्या समजुती/गैरसमजुती बाबत सविस्तर माहिती दिली होती.
सभेत उपस्थित असलेल्या लोकांनी आपापल्या गावी जावून जनजागृती केली. आरोग्य विभागाच्या लोकांनी सुद्धा लोकांशी संवाद साधला आणि लोकांचा प्रतिसाद वाढला.
हे देखील वाचा :
कमलापूर परिसरातील विविध मागण्यासाठी रेपनपल्ली येथे ४ जुलै ला रास्ता रोको आंदोलन
सिंदेवाहीत जबरान जोत शेतकर्यांचा एल्गार; राजु झोडे यांच्या नेतृत्वात शेतकर्यांचे धरणे आंदोलन