लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : साहित्याच्या किमती वाढल्याने शासनाने सिंचन विहिरी बांधकामाचे अनुदान थेट दोन लाख रुपयांनी अनुदान वाढवले आहेत. शेतकऱ्यांनी मजबूत विहीर बांधावी, हा यामागील उद्देश आहे. यावर्षी जिल्हयात रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ४ हजार ६४८ सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.
सिंचन विहीर बांधकामासाठी एक लाख रुपयांचे अनुदान होते. शासनाने त्यात वाढ करून ते पाच लाख रुपये केले आहे. विहीर बांधकामासाठी एवधी रक्कम खर्च होत नाही. त्यामध्ये एक ते दीड लाख रुपये सहज मिळतात असे दलालांना माहीत असल्याने विहीर बांधकामासाठी दलाल सक्रिय झाले आहेत. दीड वर्षापूर्वी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर बांधकामासाठी केवळ २ लाख ९१ हजार रुपये मिळत होते. शासनाने एक वर्षापूर्वी त्यात वाढ करून चार लाख रुपये अनुदान केले. पुन्हा : लोकसभा निवडणुकीपूर्वी विहिरीसाठी दिले जाणारे अनुदान पाच लाख रुपये केले आहे.
.शेतकऱ्यांनी सिंचन विहीर मजबूत बांधावी त्याकरिता एक ते दीड वर्षाच्या कालावधीत शासनाने अनुदानात दोन लाख रुपयांची वाढ केली आहे. वस्तूच्या किमतीत वाढ झाल्याने, व महागाई लक्षात घेता शासनाने अनुदानात वाढ केली आहे. मात्र, वाढलेल्या दोन लाख रुपयांची रक्कम आपल्या घशात टाकण्यासाठी विहीर बांधून देणारे दलाल सक्रिय झाले आहेत. दलालाकडे विहीर बांधकामाची सूत्रे सोपवल्याने विहिरीच्या मजबुतीपेक्षा पैसे कसे वाचतील याला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे विहिर कमजोर होत आहे
सिंचन विहिरीचे अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते. विहिरीचे बांधकाम झाल्यानंतर शेतकऱ्याने रक्कम देण्यास नकार दिल्यास दलालाची अडचण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्याकडून बँकेचे धनादेश घेऊन ठेवले जातात. विहीर अनुदानाचे पैसे जमा होताच धनादेशाच्या साहाय्याने पैसे दलालांच्या खात्यात वळते केले जातात.
हे ही वाचा,