चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे व स्वागताध्यक्षपदी डॉ. बबन जोगदंड यांची निवड!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क,दि. ५ डिसेंबर : कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांची तर स्वागताध्यक्षपदी यशदा पुणे येथील अधिकारी
उच्चविद्याविभूषण डॉ.बबन जोगदंड यांची निवड झाली अशी माहिती या संमेलनाचे संयोजक चंद्रकांत शहासने यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे .

पुण्यात २०१८ सालापासून राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आयोजन केले जाते. सन २०१८,२०१९ आणि २०२० मध्ये प्रतीवर्षी ही संमेलने शिवाजीनगर पुणे, आळंदी, पर्वती पुणे येथे झाली. आता हे संमेलनाचे चौथे वर्ष आहे. सुरुवातीच्या दोन संमेलनासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सहकार्य लाभले. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण ही देखील राष्ट्रभक्ती आहे असा व्यापक विचार समाजामध्ये रुजविण्यासाठी व त्याविषयी जनजागृती करण्यासाठी संमेलनाचे आयोजन केले जाते. गेल्या तीन साहित्य संमेलनांमध्ये अनेक तज्ञांनी, अभ्यासकांनी आणि मान्यवरांनी याविषयीचे मार्गदर्शन संमेलनाच्या निमित्ताने केलेले आहे.

हभप रंगनाथ नाईकडे वनसंरक्षक, पुणे, प्रा. शरच्चंद्र दराडे पाटील, एमआयटीच्या डॉ. जयश्री तोडकर अशा मान्यवरांनी संमेलनाची अध्यक्षपदे भूषविलेली आहेत. यावर्षी अध्यक्षपद डॉ. रामचंद्र देखणे व स्वागताध्यक्षपद बबन जोगदंड हे भूषविणार आहेत.
हे संमेलन दि. २६ डिसेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन शिवाजीनगर पुणे येथे सकाळी ९.३० ते रात्री ८.०० या वेळात होणार आहे. या संमेलनात परिसंवाद चर्चासत्र कवी संमेलन मान्यवरांचे सत्कार पारितोषिक वितरण असे भरगच्च कार्यक्रम असतील.
या वर्षीचे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पर्यावरण, आरोग्यसाक्षरता आणि राष्ट्रभक्ती या विषयाला वाहिलेले असून त्याविषयी प्रचार, प्रसार व्हावा असा संमेलनाचा उद्देश आहे.

यावर्षी पर्यावरण विषयात तज्ञ अभ्यासू व प्रतिष्ठित मंडळींना साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. या संमेलनात राष्ट्रप्रेमी व दानशूर मंडळींनी तनमनधनाने सहभाग नोंदवावा, असे आवाहान संस्थेचे विश्वस्त चंद्रकांत शहासने, (देशभक्तकोशकार) पुणे यांनी केले आहे.

हे देखील वाचा : 

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत !!

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका!.. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींनी हजारो मेणबत्त्यांनी उजळवले चवदार तळे

Dr. Baban Jogandadlead newsRamchandra Dekhne