आशा सेविकांनी आपले हक्क मागण्यांसाठी केले भीक मांगो आंदोलन!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. २२ जून : कोरोनाच्या संकट काळात आशा सेविकांना तळागाळात जाऊन सेवा दिली. आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचा सामना केला. तरीही सरकार आम्हाला योग्य आर्थिक मोबदला द्यायला तयार नाही. त्यामुळं आक्रमक झालेल्या मोर्चेकरी आशा सेविकांना सोमवारी पोलिसांनी हुसकावून लावलं. त्यामुळं आणखी संतापलेल्या आशा व गट प्रवर्तकांनी मंगळवारी थाली बजाओ, भिक मांगो आंदोलन करीत संविधान चौक दणाणून सोडला.

राज्य भरातील आशा व गट प्रवर्तकांनी सात दिवसांपासून आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. सात दिवस झाले. आज आंंदोलनाचा आठवा दिवस आहे. तरीही प्रशासनाकडून भूमिका घेणं तर दूरच सरकार आमच्याशी चर्चा देखील करायला तयार नाही. कोरोनाच्या संकट काळात आपला, कुटुंबाचा जीव धोक्यात घालून आशा सेविकांनी तळागाळात जाऊन रुग्ण सेवा दिली आहे. मात्र सरकारने त्यांना कोरोना भत्ता देखील दिलेला नाही. त्यामुळे हा अन्याय आता असह्य होत आहे, अशी हाक देऊन राज्यभरातील आशा सेविका सात दिवसांपासून रस्त्यावर उतरल्या आहेत.

याचाच एक भाग म्हणून सोमवारी सुभाष नगर येथून मोर्चा काढणाऱ्या आशा सेविकांना पोलिसांनी पिटाळून लावलं. त्याचे पडसाद आज संविधान चौकात उमटले. आशा सेविकांना मानधन देण्यासाठी पैसा नसल्याचं उत्तर सरकार देत असेल तर आम्ही त्यांना पैसा देऊ असा पवित्रा घेत आशा सेविकांनी बुधवारी संविधान चौकात भीक मांगो – थाली बजाओ आंदोलन करीत परिसर दणाणून सोडला.

राज्यभर हा तिढा निर्माण झाल्यानं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रालयात राज्य कृती समितीची बैठक बोलावली आहे. त्यावर काय तोडगा निघतो, याकडे आता आशा व गटप्रवर्तकांचं लक्ष लागलं आहे.

हे देखील वाचा :

अन् बच्चुभाऊ कडू युसुफ खा पठाण बनतात तेव्हा…

डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून ७५०० नमुने पाठवले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!,आता IRCTC मधून तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार रिफंड

 

 

asha workerlead story