खा. अशोक नेते यांच्या हस्ते अहेरी विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २० फेब्रुवारी: अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, गोविंदपूर, लगाम, बोरी, आंबटपल्ली परिसरातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं सदस्यांचा भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते आज दि. 20 फेब्रुवारी रोजी आलापल्ली येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अनुसूचित जनजाती मोर्चा चे प्रदेश सदस्य संदीप कोरेत, भाजपचे जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, ज्येष्ठ नेते दामोदरजी अरगेला, अहेरी तालुकाध्यक्ष रवीभाऊ नेलकुद्री, अहेरी शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, तालुका महामंत्री मद्दीवार, तालुका महामंत्री पोशालु चुधरी, एटापल्ली भाजयुमोचे निखील गादेवार, व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना पक्षाची कार्यपद्धती, ध्येयधोरण व संघटनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .

ashok neteRavindra Ollalwar