खा. अशोक नेते यांनी घेतला कोरचीतील कोविड स्थितीचा आढावा

आदिवासी, दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे खा. अशोक नेते यांचे निर्देश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, १० मे :  कोविडच्या दुसऱ्या लाटेत गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोविड बाधीत रुग्ण आढळुन येत आहेत. त्याचप्रमाणे कोरची तालुक्यातही रुग्ण वाढत आहेत यावर नियंत्रण मिळवून रुग्णावर योग्य उपचार करून कोविड रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे  निर्देश गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी दिले. कोरची तहसील कार्यालयात आज १० मे रोजी आयोजित कोविड च्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देतांना ते बोलत होते.

कोरची तालुक्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली आरमोरी विधानसभाचे आ. कृष्णाजी गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते देवरावजी गजभिये, अनुसूचित जाती मोर्चा चे जिल्हा महामंत्री आनंदजी चौबे, भाजपचे  कोरची तालुका सोशल मीडिया प्रमुख नंदुभाऊ पंजवानी, तहसीलदार भंडारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विवेक मडावी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राऊत, बीडीओ, नप मुख्याधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खा. अशोक नेते यांनी कोविडचा आढावा घेतला असता आतापर्यंत एकूण ३६३ कोरोना बाधीत झाले असून सद्यस्थितीत ३२ कोरोना बाधीत रुग्ण आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरची येथे २ कोविड केअर सेंटर असून तालुक्यात ४ लसीकरण केंद्र आहेत ४ ऑक्सिजन सिलेंडर असून आतापर्यंत २९८५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून ११० लस उपलब्ध असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ विवेक मडावी, वैद्यकीय अधीक्षक डॉ राऊत यांनी दिली.

यावेळी खा. अशोक नेते यांनी जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी आदिवासी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असून अधिकाऱ्यांनी जनजागृती शिबिर घेऊन लोकांना कोविड व लसीकरण संबंधातील माहिती द्यावी व कोरोना रुग्णांवर योग्य उपचार करावा अशा सूचना यावेळी खा. अशोक नेते यांनी दिल्या. बैठकीला प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट..

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोन महिला ठरल्या वाघाच्या बळी

अहेरीतील अनाधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय सील

स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे काम करून ‘ती’ करते कुटुंबाचा उदरनिर्वाह

Ahok NeteKrushna Gajabelead story