खा. अशोक नेते यांनी घेतला कोविशिल्ड वैक्सिन चा दुसरा डोज

  • नागरिकामधील संभ्रम दूर करण्यासाठी गावातील आरोग्य केंद्रात घेतली वैक्सिन.
  • “वैक्सिन मी पण घेतली, आपणही घ्या” चा दिला संदेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सावली, दि. २५ एप्रिल: आजही अनेक नागरिक कोरोना लसीकरण करण्यासाठी घाबरत आहेत त्यांच्यामध्ये समज-गैरसमज निर्माण झालेले आहेत ते दूर करून लसीकरणसाठी नागरिकांना परावृत्त करण्यासाठी खा. अशोक नेते यांनी सावली तालुक्यातील बोथली (हिरापूर) गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी कोविशिल्ड ही लस घेतली व नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले.

    यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजकुमार गेहलोत, सावली चे भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व परिचारिका उपस्थित होते. यावेळी खा. अशोक नेते यांनी सांगितले की मी ९ मार्च २०२१  रोजी दिल्ली येथील संसद भवनात कोविशिल्ड लसीचा पहिला डोज घेतला असून आज दुसरा डोज तुमच्या गावात घेत आहे. या लसीपासून तुम्हाला कोणताही धोका नसून ही लस पूर्णपणे सुरक्षित असून तुमचे कोरोना या आजारापासून बचाव करणारी आहे. या लसीमुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढत असून तुम्हाला कोरोना व्हायरस पासून दूर ठेवते त्यामुळे निःसंकोचपणे ही लस घेण्याचे आवाहन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले. तसेच लसीकरण केंद्रावरील माहिती जाणून घेऊन सर्व नागरिकांना लस देण्याचे सूचना आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या.

ashok nete