लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. १४ जानेवारी : धानोरा नगर पंचायत निवडणूक दरम्यान खा. अशोक नेते यांनी आज दि. १४ जानेवारी रोजी धानोरा येथे जाऊन वार्ड क्र. ५ मध्ये बैठक घेतली व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली व निवडणूकीच्या हालचाली बाबत माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथजी साळवे, महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या ताराबाई कोटांगले, तालुका महामंत्री विजय कुमरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, महादेव गणोरकर, अनंत साळवे, वार्ड क्र.५ चे अधिकृत उमेदवार राजेंद्र श्रीपदवार, गणवीर गजपुरे, चांगदेव करकाडे, बाळू उंदिरवाडे, युवा नेते सारंग साळवे, प्रकाश मारभते व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवून परिश्रम घेण्याचे आवाहन केले.
हे देखील वाचा :
एस.टी. कर्मचाऱ्यांचा तोडगा फक्त कॉग्रेस पक्षच काढू शकतो; कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले