लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
स्वतःच्या खिशाला कात्री लावून गोरगरीब अनाथ तसेच विविध शैक्षणिक संस्थेसाठी आर्थिक मदत करणारे असंख्य हात आजही आपल्याला पाहायला मिळतात. काही अनामिक राहून गरजूवंतासाठी मदतीचे हात पुढे करतात. तर काही संस्था रुग्णसेवेचा वसा घेऊन कार्य करीत आहेत. प्रसिध्दीपासून लांब असलेल्या काही मोजक्या संस्था आणि व्यक्तींच्या कार्याचा हा वेध….
नागपूर : आसान्या फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था मागील काही वर्ष्यापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे .यामध्ये गोर गरीब मुलांमुलींचे वसतिगृह , मोफत पशू चिकित्सालय, वृक्षारोपण , गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती , वृद्धाश्रम, ऑनलाइन वेबिनार राबवून समाजात सकारात्मक दिशा देऊन बदल घडवून आणण्याचा काटेकोर प्रयत्न सुरू असून आसान्या फाऊंडेशनचे कार्य लक्षात घेता समाजापयोगी कार्यक्रम राबवून समाजात एक नवीन स्थान प्राप्त केल्याचे त्यांचे कार्यातून स्पष्ट होत आहे. तसेच केलेल्या कामातून स्वतः त्याचा अनुभव घेऊन केलेल्या समाज उपयोगी कामावर प्रभावित होऊन दिनांक १० नोव्हेंबर रोजी “आसान्या फाऊंडेशन”, या संस्थेला GST , Customs and Central Excise SC, ST, OBC Employees’ Welfare Association, नागपूर या संघटेने देणगी स्वरुपात रू. ५०,०००/- चा धनादेश सुपूर्द केला.
आसान्या फाउंडेशनची स्थापना झाल्यापासून आजतागायत कार्यक्रमाला वेलफेयर एसोसिएशनच्या अध्यक्ष्या श्रीमती माया धोंगडे इतर पदाधिकाऱ्यासमवेत उपस्थीत होत्या. आसान्या फाउंडेशन राबवित असलेले उपक्रम पाहून त्या प्रभावित झाल्या व सामाजिक बांधिलकी म्हणून त्यानी संघटनेच्या सदस्यांकडून ५००००/- रू चा निधी गोळा कडून GST कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती माया धोंगडे व सरचिटणीस श्री. भूपेंद्र यांनी देणगीचा धनादेश आसान्या फाउंडेशनच्या श्रीमती शिल्पा वावरे , श्री. रिमोद खरोले, श्री दिनेश सातदेवे ह्यांना सुपुर्द केला. दिनांक २३ जून २०२२ रोजी आसान्या फाऊंडेशन या संस्थेची स्थापना झाली. दरवर्षी ३५ होतकरू व गरीब महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रू. २५००/- प्रतीमाह शिष्यवृत्ती या संस्ठेमार्फत देत आहे. समाज प्रबोधनपर, आर्थिक व न्यायिक स्वरूपाच्या अनेकविध विषयांवर तज्ञांद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येतात.
आसान्या फाऊंडेशन द्वारा नागपूर व चंद्रपूर येथे गरीब व ग्रामीण मुलामुलींसाठी वसतिगृह चालवण्यात येत आहे. तसेच रविनगर येथे वाचनालय व अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या कामांनी प्रभावित होऊन आपला देखील हातभार लावावा या उद्देशाने आसान्या फाऊंडेशन, नागपूरला GST कर्मचारी संघटनेच्या सभासदांनी निधी उभारून देणगी दिली. प्रसंगी GST कर्मचारी संघटनेचे श्री. सिद्धार्थ जनबंधू, श्री. राजकुमार तितरे, श्रीमती शारदा पाटील, श्री. अरुण बांबोळे व श्री. रामानंद बनसोड उपस्थित होते. आसान्या फाउंडेशन च्या कार्यात सहभागी होण्यासाठी संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक 7588476472 वर संपर्क साधावा असे आवाहन श्री अरविंद उपरकर ह्यानी केले आहे .
हे ही वाचा,