दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नवी दिल्ली : विधानसभा निडणुकांपूर्वीच राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या असून आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. आज अरविंद केजरीवाल हे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा उपराज्यापलांकडे सोपवणार आहेत. यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याबद्दल चर्चा रंगली आहे. अखेर आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्‍याचे नाव समोर आले आहे. तब्बल दहा वर्षांनी दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसवणार आहेत, असा आरोपही भाजप नेत्यांकडून केला जात होता. मात्र, अरविंद केजरीवाल यांना मनाचा मोठेपणा दाखवत, आपल्या पक्षातील महिला नेत्या आणि मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी  यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीच्या सभागृहात ठेवला आहे. मंत्री आतिशी ह्याच दिल्लीच्या मुख्यमंत्री  होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, शीला दीक्षित यांच्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहेत. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करतील, असा दावा भाजप प्रवक्त्यांनी केला होता, पण त्यांचा हा दावा फोल ठरला.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे.  आप नेत्या आणि मंत्री आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काँग्रेसच्या तत्कालीन नेत्या शिला दीक्षित ह्या 10 वर्षांपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत्या. अण्णा आंदोलनानंतर दिल्लीत मोठा राजकीय बदल झाला, आणि दिल्लीचे सुत्रे नव्याने स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाच्याहाती गेली. त्यानंतर, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. मात्र, गतवर्षभरात मद्य धोरण घोटाळ्यात त्यांच्यावर कारवाई करत ईडीने त्यांना अटक केली होती. त्यानंतर, जामीनावर बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

Arvind KejariwalArvind KejriwalAtishiChief Minister
Comments (0)
Add Comment