लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 19 जुलै – पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरबाबत सध्या अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरची अवैधरित्या घुसखोरी प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आतापर्यंत तरी काही ठोस असं समोर आलेलं नाही. सीमा हैदरची चौकशी करत असलेल्या केंद्रीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी भारत-नेपाळ सीमेवर सुनौली सेक्टर आणि सीतामढी सेक्टरमध्ये अद्याप तरी थर्ड नेशन सिटिजन आढळल्याचे समोर आलेलं नाही.
एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हैदरने अत्यंत कडक प्रशिक्षण घेतले असावे. त्यामुळे ती एकच उत्तरे देत असून जबाव बदलत नसावी. त्यामुळेच आता पोलीस चौकशीदरम्यान मानसशास्त्रज्ञाला सोबत घेऊन तपास करण्याची शक्यता आहे. जेणेकरून सीमा खोटे बोलतेय की खरं यावर बारकाईने लक्ष ठेवता येईल.
भारत नेपाळ सीमेवर दोन्ही ठिकाणाहून सीमा हैदर आणि सचिन यांनी भारतात प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. यानतंर उपलब्ध रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फूटेजची चौकशी केली गेली आहे. सध्या या माहितीची पडताळणी होऊ शकलेली नाही. चौकशीत सचिन आणि सीमा यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणेनं 1850 किमी लांब भारत नेपाळ सीमेवरील सर्व बस मार्गावरून 13 मे रोजी जाणाऱ्या बसचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले.
हे पण वाचा :-