आम. आव्हाड यांनी विवीयाना माॅलमध्ये हर हर महादेव चित्रपट पाडला बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 08 नोव्हेंबर :- सध्या हर हर महादेव या चित्रपटावरून महाराष्ट्रात वाद पेटला आहे. या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या सिन्सवर काही नेता आक्षेप घेत आहे. ठाणे येथील विवीयाना माॅलमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते यांनी हर हर महादेव हा चित्रपट बंद पाडला. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला म्हणून खा. छत्रपती संभाजी राजे यांनी प्रथम आक्षेप घेतला होता. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षातून या चित्रपटाला विरोध होउ लागला आहे.

मराठ्यांच्या इतिहासाचा विपर्यास कुठल्या हेतुने? शिवाजी महाराज विरूध्द बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पटवेल का? असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टद्वारे नेटकर्यासमोर मांडले आहेत. तसेच तान्हाजी, पावनखिंड आणि हर हर महादेव या चित्रपटांचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये केला असून या चित्रपटांमध्ये दाखविण्यात आलेल्या सिन्स वर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकत्र्यांनी काल ठाण्याच्या विवीयाना माॅलमध्ये सुरू असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. हर हर महादेव हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे आहे. चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर यांनी प्रमुख भुमिका साकारल्या आहेत.

हे पण वाचा :-

'Har Har Mahadev'Awadhblockedmovie in