तिरंगा रॅलीतून आपत्ती व्यवस्थापनवर जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – हर घर तिरंगा अभियानांतर्गत 13 ऑगस्ट रोजी गांधी चौक ते आयटीआय चौक या दरम्यान आपत्ती व्यवस्थापन जनजागृती मॅरॉथॉन आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घेऊन महसूल पंधरवडा अंतर्गत तहसील कार्यालय गडचिरोली येथील महसूल कर्मचारी तसेच हर घर तिरंगा अंतर्गत नगर परिषद गडचिरोली यांचे कर्मचारी यांनी तिरंगा ध्वज घेऊन उत्फुर्तपणे सहभाग घेतला. रॅलीत आपत्ती व्यवस्थापन चे महत्व तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने विवीध बँनर,पोस्टर, सेल्फी पाईन्ट चे माध्यमातून संदेश देण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष संजय दैने, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाले, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, तहसीलदार दिपक गुत्ते, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलिस निरीक्षक जि.जे. खोब्रागडे तसेच चौरंग संस्थेचे प्रतिनिधी विनोद मडावी यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाला‌. मॅराथॉन मध्ये एनसीसी,एनएसएस, होमगार्ड,स्काँऊट गाईड,आपदा मित्र,एसडीआरएफ पथक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. प्रथम 3 विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैनेहर घर तिरंगा अभियान