२० जानेवारीपासून जालन्यातील साष्टपिंपळगाव येथे गावकऱ्यांच्या वतीने राज्यव्यापी ठिय्या आंदोलन केलं जाणार आहे
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी गावातून काढली बैलगाडी, ट्रॅक्टर आणि मोटारसायकल जनजागृती फेरी काढण्यात आली.
विजय साळी जालना, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना 05 जानेवारी:- केंद्र आणि राज्य या दोन्हीही सरकारनं एकत्रित भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं या मागणीसाठी २० जानेवारीपासून जालन्यातील साष्टपिंपळगाव येथे गावकऱ्यांच्या वतीने राज्यव्यापी ठिय्या आंदोलन केलं जाणार आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज साष्टपिंपळगाव येथील गावकऱ्यांनी गावातून बैलगाडी, ट्रॅक्टर आणि मोटारसायकल जनजागृती फेरी काढली.या जन जागृती फेरीत गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या फेरीदरम्यान गावकऱ्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे’, अशी घोषणाबाजी करून गावाचा परीसर दणाणून सोडला. येणाऱ्या २५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार असून केंद्र आणि राज्य सरकारने मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळण्यासाठी योग्य बाजू मांडुन आरक्षण मिळवून द्यावं अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू असा ईशारा गावकऱ्यांनी दिलाय.