चक्क! १ हजार मिटरच अंतर अवघ्या सहा मिनीटं एक सेकंदात कापलं ‘या’ चिमुकलीने

एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा :  तीन वर्षे चार महिन्यांच्या चिमुकलीच्या पावलांनी वेगवान धावत रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ही नोंद केली आहे. हजार मीटरच अंतर अवघ्या सहा मिनीट एक सेकंदांत पूर्ण करणा-या चिमुकलीचं नाव या रेकॉर्डमध्ये कोरलयं.

वर्ध्याच्या पुलगाव इथली आर्या पंकज टाकोने. वर्ध्यातील गांधीजींच्या पुतळ्यापासून सेंट अ‍ॅन्थोनी इंटरनॅशनल स्कुलपर्यंत एक हजार मीटरचं अंतर आर्यानं अवघ्या सहा मिनीटं एक सेकंदात पार केलयं. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास हा रेकॉर्ड नोंदवल्या गेला.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी एक हजार मीटर अंतर धावण्यास आठ मिनीटं तर एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी सात मिनीटांचा वेळ दिला होता. आर्यानं हे अंतर त्यापेक्षाही कमी वेळात पूर्ण करून रेकार्डवर नाव कोरलयं. या रेकॉर्डची घोषणा डॉ. मनोज तत्ववादी यांनी केली आहे.

आर्याचे वडिल पोलिस कर्मचारी असून स्वत: खेळाडू आहेत. दीड वर्षांपासून तिची यासाठीची तयारी सुरू आहे. भविष्यात ऑलिम्पीकसाठीची तयारी करणार असून ती भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली खेळाडू राहिलं,  हे ध्येय असल्याचं आर्याच्या वडिलांनी सांगितलंय.

हे देखील वाचा :

पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकलने निघाली ‘ती’ महाराष्ट्र भ्रमंतीला!

परकीय भाषा शिकणे झाले सहज आणि सोपे

(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

 

arya takonelead storyWardha District