चक्क! गोठयांतून 4 शेळ्या व 3 बकऱ्याची चोरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. ५ मार्च: कोरचीतील मरारटोली येथील वसंता दसरू मोहूर्ले यांच्या घरालगत असलेल्या गोठयांतून 4 शेळ्या व 3 बकऱ्याची गुरुवारी रात्रौ 2 ते 3 च्या दरम्यान चोरी करून चोर पसार झाले.

सदर गोठ्यात 5 बकरे व 17 शेळ्या होत्या अज्ञात चोराने रात्रीची संधी पाहून चोरी केली. रात्रौ अचानक जोराने शेळ्याचा आल्यामुळे घरामध्ये झोपलेले वसंता मोहूर्ले यांना जाग आली व घराबाहेर पडण्याकरिता निघाले असता, त्यांच्या घरातील दरवाज्याची कुंडी बाहेरून लावण्यात आली होती. म्हणून मागच्या दरवाज्या कडून बाहेर आले. चोरांना महिती होतास शेळ्या व बकऱ्या घेऊन चोर पसार झाले.