आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे रोजच्या जीवनात मोठा उपयोग

डॉ. अंजली बोलगुलवार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,  23 ऑक्टोबर :- आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे आपल्या रोजच्या जीवनात मोठा उपयोग असून हर दिन हर घर आयुर्वेद संकल्पना व त्याचे महत्व डॉ. अंजली बोलगुलवार यांनी स्पष्ट केले. त्या राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व भगवान धन्वंतरी जयंती कार्यक्रमात बोलत होत्या. आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र तळोधी मो. येथे 22 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस व भगवान धन्वंतरी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची अध्यक्षता प्रभारी सरपंच मनोहर बोद्दलवार यांनी केली.

यावेळी योगा शिक्षिका निर्मला कोठावार यांनी योगासने व प्राणायाम चे प्रात्याक्षिक करून दाखविले आणि त्यांच्या उपयोगावर मार्गदर्शन केले. यावेळी वनरक्षक रविंद्र बागडे, माजी ग्रापं सदस्य मानापुरे, ग्रापं सदस्य वासेकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रस्ताविक मनोज मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन आशावर्कर दामिनी गेडाम यांनी केले. या कार्यक्रमात उपस्थितांना गोडवेलची झाडे देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-

केंद्र सरकारने रद्द केला परदेशी निधी परवाना

5 तासांपेक्षा कमी झोप देते विविध आजारांना आमंत्रण

Ayurvedicmedicinalplants