लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
देसाईगंज, 22 ऑगस्ट : खर्राचे वाढते व्यसन लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांसह महिला व पुरूषांना जागृत करण्याचे काम मुक्तीपथ तर्फे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून देसाईगंज तालुक्यातील चोप येथील जिप शाळेत आयोजित उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहून खर्राचे व्यसन सोडण्याची विनंती केली.
खऱ्याचे वाढते प्रमाण बघता मुक्तिपथ टीम तर्फे शाळा- शाळांमध्ये तंबाखू, खर्रा व्यसन विरोधी मार्गदर्शन केले जात आहे. नुकतेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांची शाळा चोप येथे खर्रा, तंबाखू, दारू या विषयावर मुक्तीपथ टीम तर्फे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी व्यसनावर आधारित गीत मुलांना शिकविण्यात आले. दरम्यान गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये खर्रा खाण्याचे खूप जास्त प्रमाण असल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी नियोजन करून शाळेतील मुलांनी “आई-वडिलांना पत्र” लिखाण केले असून मुलांच्या हाताने हे पत्र आई-वडिलांना देण्यात येणार आहे. थोडे भावनिक, थोडी जबाबदारीची जाणीव, समोरची पिढी वाचवण्यासाठी हे पत्र लिखाण करून खर्राचे व्यसन सोडण्याची विनंती विद्यार्थ्यांनी पालकांना केली.
हे पण वाचा :-
https://youtu.be/0W5cwagvLOw
https://youtu.be/V_WLWQtGeKU