सोशल मिडिया वर अश्लील, देशविरोधी पोस्ट करण्यास बंदी

केंद्र सरकार ने सोशल मिडिया कंपन्यांसाठी केले नवे नियम लागू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  29, ऑक्टोबर :-  फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्टिटरला केंद्र सरकार ने 72 तासांत आक्षेपार्ह मजकुर हटवण्याची जबाबदारी कंपन्यांवर दिली आहे. तसेच अश्लील, देशविरोधी पोस्ट करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच 90 दिवसांत तक्रार निवारण प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात येणार आहे. केंद्र सरकार ने शुक्रवारी सोशल मिडिया कंपन्यांच्या नियमांमध्ये हे मोठे बदल केले आहेत.

सोशल मिडिया प्लॅटफाॅमवर उपलब्ध सामग्री आणि इतर समस्यांबाबत दाखल केलेल्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण करण्यासाठी तीन महिन्यांत अपीलीय समित्या स्थापन करण्याची घोषणा केली. या समित्या मेटा आणि व्टिअर सारख्या सोशल मिडिया कंपन्यांद्वारे सामग्रीच्या नियमनाबाबतच्या निर्णयांचे पुनरावलोकन करण्यास सक्षम असणार आहेत.

केंद्र सरकार ने शुक्रवार 28 ऑक्टोबर रोजी याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये सरकार तक्रार समिती स्थापन करेल, जिथे युजर्सना व्टिटर सारख्या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मबाबत काही तक्रार करायची असेल तर सरकारच्या तक्रार कक्षाची मदत होणार आहे. फेसबूक आणि व्टिटर वर मोठ्या टेक कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे हे मोठे पाउल आहे.

हे देखील वाचा :-

anti-nationalBanningobsceneposts onsocial media