लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असतानाच दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद व नगर पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरु केणी आहे. यामध्ये कोण कोणाचे शिलेदार, आपल्याकडे खेचतो, कोण कोणाला शह देतो, हे विधानसभेच्या निकालानंतरच कळेल.
पदाधिकार्यांना आकर्षित करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्याकडून आताच कोणाला पदाचे आश्वासन देण्याचा सपाटा सुरु केला आहे. विधानसभेच्या माधमातून स्थानिक स्वराज्य संस्थांची पायाभरणी केली जात आहे. जिल्हाच्या राजकारणात मिनी मंत्रालयाचे मोठे महत्त्व आहे, हे सभागृह ग्रामीण भागाचे सत्ताकेंद्र मानले जाते. यासोबत शहरी भागात नगर पालिका व नगर पंचायतीतील सत्तेतही महत्व आहेच सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मताधिक्यात भर घालण्याची क्षमता ठेवणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना हेरण्याचे काम महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार व प्रमुख नेतेमंडळी कडून सुरु आहे.
अशा पदाधिकाऱ्याना खास भेटीचे निमंत्रण, उमेदवारी तसेच येत्या काही दिवसात पदाधिकाऱ्यांच्या मोठया प्रमाणात कोलाटउड्या पहावयास मिळणार आहेत.