लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुल:- मागील कित्येक वर्षापासून बेंबाळ 11 KV फिडर वरून पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा, जुनगाव, घोसरी तसेच इतर गावांना जोडण्यात आले होते. त्यामुळे बेंबाळ फिडरवर मोठा ताण पडून लाईट वारंवार बंद पडत होती. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते आणि याबाबत महावितरणला निवेदनही दिले होते.
त्यामुळे पोंभुर्णा सब डिव्हीजन मधून देवाडा,जुनगाव, घोसरी व ईतर गावांना जोडण्यात आले असून त्यामुळे बेंबाळ फिडरवरील ताण कमी झाला आहे.पुन्हा बेंबाळ 11 KV फिडरवर पोंभुर्णा तालुक्यातील अन्य कोणत्याही गावांना जोडण्यात येऊ नये व पोंभुर्णा सब डिव्हिजन मधील ब्रेक डाऊन झाल्यावर बेंबाळ फिडरवरून विद्युत पुरवठा करू नये.सध्या विद्यूत पुरवठा सुरळीत असून महावितरणला वरिल मागणीसाठी युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे यांनी निवेदन दिले.
पुन्हा नवीन गावांना बेंबाळ फिडरवर जोडणी केल्यास संपूर्ण बेंबाळ व परिसरातील नागरीकांना घेऊन याविरोधात तीव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा त्यांनी दिला.