लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीड, दि. ३ सप्टेंबर: अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून प्रशासनाला वारंवार अर्ज विनंत्या करूनही कार्यवाही होत नसल्यामुळे तरुणांन टोकाचे पाऊल उचलत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील मंदिराच्या अतिक्रमण आतील जागा प्रशासनाने सोडवावी यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या मध्यस्थीमुळे तरुणाचे प्राण वाचले.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मोठा अनर्थ टळला माजलगाव तालुक्यातील तालखेडा येथील तरुण मंदिराच्या जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार घेऊन वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात आला मात्र त्याची तक्रार कोणी घेतली नाही. परिणामी आज निराश होऊन त्यांना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला नेमकं हे टोकाचं पाऊल या तरुणानं का उचलले याचा तपास पोलीस घेत आहेत.
हे देखील वाचा :
धुळ्यातील भूषण संजय पाटील या तरुण दिग्दर्शकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचा मानांकन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस