मराठा आंदोलकांचा विश्वासघात – प्रकाश आंबेडकर यांची सरकारवर टीका.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर, दि. २१ नोव्हेंबर :

मराठा विद्यार्थांना सरकारने दिलासा देणे आवश्यक होते. परंतु सरकारने मराठा आंदोलकांचा विश्वासघात केला. सरकारने न्यायालयाच्या अधीन राहून जे विद्यार्थी शिकत आहेत, त्यांना फ्रीशिप व स्कॉलरशीप द्यायला पाहिजे होती. मात्र  हे सरकार करायला तयार नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, २००६ मध्ये अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या विविध संघटनांच्या मागणीवरून तत्कालिन राज्य सरकारने एक कायदा केला होता. त्या कायद्याअंतर्गत खाजगी शिक्षण संस्थामध्ये ओबीसी, आदिवासी, एसटी, व्हीजेएनटी आदी विविध प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थांना  आरक्षणाचा लाभ देण्यात आला. त्या कायद्यानुसार, त्यावर्षी सुमारे अडीच लाख जागा मागास विद्यार्थांचा भरण्यात आल्या. परंतु त्यानंतर खासगी शिक्षण संस्थांच्या दबावातून सरकारने एक अधिनियम पास करून त्या प्रवेश कोट्यात ५० टक्के कपात केली. त्यामुळे दरवर्षी १ लाख २५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यातून देशाचे नुकसान आहे. दरवर्षी मागासवर्गीय विद्याथ्र्यांच्या होणार्‍या १ लाख २५ हजार जागांच्या नुकसानीकरिता भाजप आणि काँग्रेस आघाडी हे दोघेही दोषी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Ad. Prakash Ambedkar