भामरागड पोलीसांनी आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या महिलेचे वाचवले प्राण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 24 ऑगस्ट – 22 ऑगस्ट रोजी दुपारी भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलाच्या सुरक्षा कठडयावरुन भामरागड मधील एका महिलेने नदीत उडीमारत आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तिला वाचविण्याचे प्रयत्न केले परंतु नदीचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले, त्यामुळे तेथील नागरिकांनी तात्काळ जलद प्रतिसाद पथक महिलेस वाहत्या पाण्यातुन बाहेर काढले, महिला घाबरलेल्या व अस्वस्थ परिस्थिीतीत होती त्यामुळे क्युआरटीच्या जवानांनी त्वरीत ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे संपर्क करुन रुग्णवाहिका बोलावून सदर महिलेस उपचाराकरीता रुग्णालयात भरती केले.

भामरागड (क्युआरटी) च्या जवानानी वेळेची दिरंगाई न करता एक छोटी तुकडी तात्काळ त्याठिकाणी मदतीस पोहचली पाण्यातुन बाहेर काढले व रुग्णालयात भरती केले.सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात योगंेद्र सेडमेक, गंड्राकोटा, शंकर हबका व सुरेश कुडयेटी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला व कायदा व सुव्यवस्था राखणे याच बरोबर समाजाशी आपुलकीचे नाते जपत पोलीसांनी दाखविलेल्या या साहसी कार्याचे कौतुक भामरागड येथील नागरीकांनी केले.

bhamaragad policegadchiroli policepolice save woman life