भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 19 जानेवारी: अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, इतर सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी ती  रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी  दि. 6 जानेवरी 2017 च्या निर्णयान्वये ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना”  सुरु केलेली आहे.

सन 2020-21 करीता या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 11 वी, 12 वी, पदवी, पदवीका परिक्षेमध्ये 50 टक्केपेक्षा अधिक गुण असणे अनिवार्य आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयात उपलब्ध आहे.

दिनांक 13 जुन 2018 च्या सुधारीत शासन निर्णयानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिल्हयामध्ये शिकत आहे. त्या जिल्हयाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी  या योजनेमध्ये 3 टक्के आरक्षण आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेसाठी खास बाब सवलत लागु राहणार नाही. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

Swadhar Yojnaसमाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त