भंडारा येथील 547 कोटींच्या कामांच्या भूमिपूजन.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

भंडारा, 24 जुन – भंडारा येथील 547 कोटींच्या कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा येथे उपस्थित होते. सुरुवातीला वैनगंगा नदीवर गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यावर जल पर्यटन निर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील भूमिपूजन केले. आणि स्वतः जल पर्यटनाचा आनंद सुद्धा घेतला. या जल पर्यटनाच्या प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्याचा पर्यटनाचा ओघ वाढेल नवनवीन उद्योगधंदे सुरू होतील आणि लोकांच्या हाताला काम मिळून जिल्ह्याचा विकास होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा येथील सभास्थळी पोहोचले आणि तिथे उर्वरित विकास कामाच्या भूमिपूजन केलं.यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता मी वर्क फ्रॉम होम करणारा किंवा फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही मी लोकात जाऊन लोकांच्या समस्या समजून घेऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. मी देणारा मुख्यमंत्री आहे त्यामुळे विकासाच्या कामासाठी भंडाऱ्याला निधी कमी पडू देणार नाही.
आमदार नरेंद्र भोंडेकर हे सुद्धा लोकांमध्ये काम करणारे नेते आहेत आमदार असावा तर असा असावा म्हणून नरेंद्र भोंडेकर यांचीही मुख्यमंत्री आणि स्तुती केली.आमदार नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यां हस्ते आज जाहिरीत्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
गोसे प्रकल्पाच्या पाण्यावर होणारा हा जागतिक दर्जाचा जल पर्यटन असल्याने यामुळे विकासाला गती मिळेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मात्र या जल पर्यटनाच्या कार्यक्रमांमध्ये भाजपाच्या आजी-माजी सर्वच नेत्यांनी पाठ फिरवली एवढेच नाही तर जल पर्यटनमंत्र्यांचा नाव सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर नव्हता त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये धुसफुस चालली तर नाही ना अशी चर्चा या वेळेस पाहायला मिळाली.

Comments (0)
Add Comment