लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेल्या पेरमिली हे गाव मध्यवर्तीचे ठिकाण आहे. या ठिकाणी विविध प्रशासनाचे व संस्थेचे कार्यालय तसेच शासकीय वसाहत, मोठ्या वस्तीत मोडणारे गाव आहे.
या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ ते ७ पर्यंत शिक्षण घेणारे स्थानिक गावातील आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वर्ग खोलीची कमतरता भासत होती. त्यासाठी गावातील शिक्षण समितीकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि आपली कैफियत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना प्रत्यक्षात भेटून मागणी केली होती.
विद्यार्थी आणि पालकांची अडचण हि आपली सर्वांची समस्या असल्याने सर्वप्रथम त्यांच्या मागणीची दाखल घेत जि. प. अध्यक्ष यांनी सन २०२०-२१ जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधीतून नविन वर्ग खोलीसाठी निधी उपलब्ध करून दिली. एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात आज पेरमिली येथील नागरिकांचा दिलेला शब्द पूर्ण केला असून आज नवीन वर्ग खोलीचे भूमिपूजन अजय कंकडालवार यांनी करून पेरमिली वासीयांची शैक्षणिक खोलीची कमतरता दूर केल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदोत्सव झळकत होता.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, पेरमिली ग्राम पंचायतचे सरपंचा किरणताई कोरेत, उपसरपंच सुनील सोयाम, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य प्रमोद आत्राम, ग्राम पंचायत सदस्य साजन गावडे, आदिवासी विध्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते अशिफ खाँ पठाण, कवीश्वर चंदनखेळे, प्रशांत गोडसेलवार, तुळशीराम चंदनखेळे गजानन सोयाम, सचिव मेश्राम व नागरिक उपस्थित होते.
हे देखील वाचा :
चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!