गोंडवाना विद्यापीठात ४ फेब्रुवारी ला मॉडेल कॉलेजचे भूमिपूजन व डाटा सेंटरचे करणार उद्घाटन – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सावंत

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिवासह प्रमुख अधिकारी राहणार गडचिरोलीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २ फेब्रुवारी: गोंडवाना विद्यापीठाच्या डाटा सेंटरचे उद्घाटन व मॉडेल कॉलेजच्या भूमिपूजन समारंभ करिता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व बहुजन कल्याण आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार हे चार मोठे नेते एकाच वेळी उद्घाटना प्रसंगी एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या मॉडेल कॉलेजच्या इमारतीचाही मार्ग मोकळा झाला आहे. तसेच अद्ययावत सध्या याबाबत डाटा सेंटरही निर्माण करणार आहेत.गोंडवाना विद्यापीठात डाटा सेंटरचे उद्घाटन व मॉडेल कॉलेजच्या भूमिपूजनाचा समारंभ 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 :30 वाजता महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत “उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय गडचिरोली” हा उपक्रम याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठात दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील व  संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत गोंडवाना विद्यापीठात प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडीअडचणी  लक्षात घेऊन त्या समस्या सोडविण्यात येणार आहे.

Eknath Shindesudhir mungantiwaruday samantVijay Wadettiwar