नवीमुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र करणार आंदोलन…

मुंबई डेस्क : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी आगरी, कोळी, कुणबी आणि भूमिपुत्र एकवटले आहेत. येत्या १० जून रोजी कोरोनाचे नियम पाळत आणि मानवी साखळी करत विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र आंदोलन करणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करुन सदर प्रस्ताव शिफारशीसह राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. मात्र नवीमुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी आता रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्र करत आहेत.

येत्या १० जून रोजी कोरोनाचे नियम पाळत आणि मानवी साखळी करत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आगरी, कोळी, कुणबी आणि भूमिपुत्र आंदोलन करणार आहेत. कल्याण-शीळ रोड, शीळफाटा ते दहिसर मोरी आणि नेवाळी नाका ते तीसगाव नाका या ठिकाणी मानवी करून शांततेत आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समिती उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली आहे.

हे देखील वाचा :

’70 वर्षांत जे कमवलं ते सगळं विकायला काढलं’,- नाना पटोलें

मोदी सरकार हे 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार; काँग्रेसची टीका

महाविकास आघाडी सरकारचा ओबीसींवर पुन्हा अन्याय – देवेंद्र फडणवीस

lead storynavi mumbai internation airport