लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चामोर्शी, दि. १ ऑक्टोंबर : नरभक्षक बिबट्याने इसमावर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास आली उघडकीस.
मृतकाचे नाव शंकर गंगाराम चिताडे (55 )रा. इल्लूर येथील रहिवासी असल्याची माहिती,
30 सप्टेंबरला सकाळी 11 च्या सुमारास मृतक इसम इल्लूर गावशेजारील जंगलात सरपणासाठी गेला होता.
रात्र होऊनही सदर इसम घरी परत न आल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. दरम्यान आज सकाळच्या सुमारास बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून ठार केल्याचे उघडकीस आले.
चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथील घटना..