Big BREAKING :अनिल देशमुख यांच्याविरोधात आता ईडीने दाखल केला गुन्हा!

100 कोटी वसुली प्रकरणात आता ईडीने सुद्धा एंट्री घेतली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, 11 मे :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात आता सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. आता या प्रकरणात ईडीने सुद्धा एंट्री केली आहे. ईडीकडून अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांच्यावर दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला. तसंच अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. अनिल देशमुख यांचं नाव आरोपी म्हणून एफआयआरमध्ये नोंद करण्यात आले आहे. तसंच, सचिन वाझे यांच्या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा हात असल्याचेही FIR कॉपीमध्ये नमूद करण्यात आले आहे. एवढंच नाहीतर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सुद्धा अनिल देशमुखांवर करण्यात आला आहे.

{हे पण वाचा:-Good News:-कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरतोय, गेल्या 24 तासात 3.29 लाख नव्या रुग्णांची भर}

anil deshamukhEDmaha policencpParb bir shing caseram kadamsachin waze