मोठी बातमी : अतिवृष्टीमुळे 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळले; 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या कांदलगाव ते महाड दरम्यान घडला हा प्रकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड : जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे काल दि. 22 जुलै 2021 ला महापारेषणच्या कांदलगाव ते महाड दरम्यान 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्यामुळे महावितरणच्या गोरेगाव विभागातील महाड व पोलादपूर उपविभाग पूर्णपणे अंधारात गेले आहे.

दोन्ही तालुक्यात 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित असून अति उच्चदाब टॉवरच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. टॉवर लाईनचे काम पूर्ण होईपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात वेळ लागू शकते.

महापारेषणच्या महाड अति उच्चदाब उपकेंद्र बंद असल्यामुळे महावितरणच्या पेण मंडळातील चांभारखिंड, जी. बी. एल, कोलोसे व तुर्भे हे चार स्विचिंग उपकेंद्र बंद पडले आहेत.

परिणामी, महाड व पोलादपूर येथील महाड शहर, बिरवाडी, विन्हेरे, वहूर, नाते, नांगळवाडी, नागाव, कुंबळे व महाड एम. आय. डी. सी तसेच पोलादपूर शहर, तुर्भे, पितळवाडी, वरंध असे एकूण 260 गावांचा वीजपुरवठा बाधित झाला असून यामध्ये ४४ उच्चदाब २२ के.व्ही फीडर व 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा टॉवर कोसळल्यामुळे खंडित झाला आहे.

हे देखील वाचा : 

मोठी बातमी: रायगडमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्बल ३६ जणांचा मृत्यू

३० हजार रूपयांची लाच घेतांना तहसीलदारांना रंगेहात केली अटक; एसीबी ची कारवाई

गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

 

lead storymahavitran poleraigad