मोठी बातमी! अखेर वाल्मिक कराडवर मकोका दाखल

न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

बीड : वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकोका लावल्यानंतर सीआयडी कोठडीची मागणी करणार आहे. सरपंच संतोष देशमुख्य यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी हा मकोका लावण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह, गावकऱ्यांचीही वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी होती. मंगळवारी वाल्मीक कराडला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद सुरू होता. त्यानंतर आता त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. तसंच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर  खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. वाल्मिक कराड  याआधी 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. वाल्मिक कराडवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. आज वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच वाल्मिक कराडवर मकोका देखील लावण्यात आला आहे.

Dhananjay MundeSantosh Deshmukh Murder caseWalmik Karad