मोठी बातमी: मंगल कुडयामी व मदनया ऊर्फ सुर्या सोमया तलांडी या दोन नक्षलवाद्यांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ११ फेब्रुवारी: छत्तीसगड मधील सँड्रा दलम मध्ये कार्यरत नक्षलवादी मंगलु कुडयामी वय २० वर्ष रा. ईरपागुट्टा जि. बीजापूर व ईडापल्ली जनमिलीशिया कंपनी दलममध्ये कार्यरत मदनया उर्फ सुर्या सोमया तलांडी वय ३८ वर्ष रा. येडापल्ली जि. बिजापुर छ.ग. या दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे.

9 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली, अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (अभियान) व अपर पोलीस अधीक्षक अहेरी यांचे मार्गदर्शनात प्राणहीता येथील सी-६० विशेष पथक व उपपोस्टे दामरंचा येथील पोलीस पथक मौजा भंगारामपेठा, कुर्ताघाट जंगल परीसरात संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना सदर नक्षलवादयांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मंगलु वंजा कुडयामी हा सन २०१८ पासुन सँड्रा दलम मध्ये दलम सदस्य म्हणुन कार्यरत असुन सन 2019 साली दामरंचा उपपोस्टे हद्दीत पोलीस नक्षलवादयांमध्ये झालेल्या कुर्ताघाट चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता. तसेच त्याच्यावर गडचिरोली जिल्हयातील इतर पोस्टे उपपोस्टे मध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

मदनया उर्फ सुर्या सोमया तलांडी हा सन 2005 पासुन नक्षल चळवळीमध्ये कार्यरत असुन सुरवातीस तो सँड्रा दलम मध्ये कार्यरत होता. सन 2007 मध्ये त्याची ईडापल्ली जनमिलीशीया कंपनी दलममध्ये बदली झाली व सध्या त्याच नक्षल कंपनीमध्ये सेक्शन कमांडर पदावर कार्यरत आहे. त्याचबरोबर सन 2019 साली उपपोस्टे दामरंचा हद्दीत पोलीस नक्षलवादयांमध्ये झालेल्या कुर्ताघाट चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता. तसेच त्याच्यावर छत्तीसगड मधील अनेक पोस्टेमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत आणि पर्सेगुडम पोलीस स्टेशन छत्तीसगड येथे त्याचे विरुध्द स्टँडींग वारंट काढण्यात आलेले आहे. वर नमुद दोन्ही जहाल नक्षलवादयांना उपपोस्टे दामरंचा अपराध क्रमांक 01/2019 भादंवि कलम 307, 353 ईत्यादी मध्ये अटक करण्यात आलेली आहे. या व्यतीरीक्त या दोघांचा आणखी किती गंभीर गुन्हयांमध्ये सहभाग आहे याचा गडचिरोली पोलीस दल तपास करीत आहे.

Naxals