मोठी बातमी! शिंदे गटाची नाव ठरली… वाचा काय आहेत नावं

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी तीन नावांचा प्रस्ताव
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 10 ऑक्टोबर :-  केंद्रीय  निवडणूक आयोगाने शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून राजकीय हालचालींना वेग आला आहे. यात ठाकरे गटाने आपल्याकडून तीन नव्या चिन्हांचा आणि नावांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही आपल्या तीन चिन्ह आणि नावं सादर केली आहेत. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे त्रिशूळ, उगवता सूर्य, गदा अशी तीन चिन्ह सादर केली आहे. तर शिंदेंनी पक्षाच्या नावाचे ३ पर्याय म्हणून बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची अशी नावं पाठवली आहे.

काल ठाकरे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावं निवडणूक आयोगाकडे सादर केली. महत्वाची बाब म्हणजे ठाकरे गटाने पाठवलेल्या नावांमध्ये देखील बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख आहे. यावरूनही नवा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- 

 

 

Eknath Shindnew party symbolshiv shenaUddhav Thackarey