लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 01 नोव्हेंबर :- राज्याचे माजी गृहमंत्र अनिल देशमुख यांचा मोठा मुलगा सलील देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून विशेष कोर्टापुढे हजर होताच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जारी झालेले समन्स रद्द करत सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी त्यांना रोख 3 लाखांचा जामीन, पासपोर्ट जाम करत तपासयंत्रणेला सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने जो ईसीआयआर नोंदवला आहे, त्यात त्यांच्या कुटूंबियांची नावे आहेत. यात 17 व्या क्रमांकावर देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे नाव आहे.
हे देखील वाचा :-