लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी, 19 ऑक्टोंबर : अल्लापल्ली एटापली मार्गावर आलापल्ली वरून काही अंतरावर तसेच येलचील जवळ गाई व म्हशी बसून राहात असल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे कठीण होते. याचा परिणाम सकाळीच एका दुचाकी स्वाराची एललचील नजीक रस्त्यावरील जनावरांना धडक दिल्याने दुचाकीची तसेच चालकाच्या डोक्याला व तोंडाला मार लागून चालक जखमी झाल्याची घटना घडली.
एटापली रस्त्यावर सध्या अनेक चार चाकी वाहने चालतात. रस्त्यावरील जनावरांचा त्रास चालकांना वाहन चालविताना होतो. पुढील अनर्थ टाळण्यासाठी आलापल्ली ग्रामपंचायत तसेच पुढील ग्रामपंचायतींनी तथा इतर संबंधित विभागाने जनावरे ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर बसून राहतात तेथील मालकांना बांधून ठेवण्यास बंधनकारक करावे, अशी वाहन चालकांची मागणी आहे. जखमीला आलापल्ली येथील दवाखान्यात उपचार करता ठेवण्यात आले. त्याची प्रकृती ठीक आहे. त्याचे नाव मात्र कळू शकले नाही.