बिरसा मुंडांचे कार्य प्रेरणादायी – वनसंरक्षक डॉ. मानकर

वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालयात शहीद बिरसा मुंडा जयंती साजरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 15 नोव्हेंबर :- बिरसा मुंडा लहान असतांना इंग्रजांनी त्यांच्या वडीलांचे जबरदस्तीने धर्मांतर केले. त्यामुळे लहानपणापासूनच बिरसा मुंडा यांना इंग्रजांचा राग होता. तसेच इंग्रजांच्या अन्यायाविरूध्द त्यांनी सशस्त्र लढा उभारला. तसेच आदिवासी समाज, आदिवासी समाजातील बांधवांवर होणार्या अन्यायाविरूध्द त्यांनी इंग्रजांविरूध्द लढा उभारला. असा शहीद बिरसा मुंडाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन वनसंरक्षक (प्रादेशिक)  डॉ. किशोर एस. मानकर यांनी केले. वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालयात आज 15 नोव्हेंबर रोजी शहीद बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

सर्वप्रथम वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. किशोर एस. मानकर यांच्या हस्ते शहीद बिरसामुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी  बिलोलकर, उपवन अभियंता बावस्कर तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी शहीद बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. संचालन संजय आत्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन ऐडलावार यांनी केले.

हे देखील वाचा :-

Birsa MundaCCF Dr. Kishor Mankarcelebrationforest department gadchiroliJayantiShaheed