यावलीत घरोघरी तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव

अमरावतीच्या यावलीत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची घरोघरी ग्रामजयंती महोत्सव साजरा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. ३० एप्रिल: अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ११२ वा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सव त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथील जन्मस्थळी आज पहाटे साडे पाच वाजता ब्रम्हमुहूर्तावर मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत हा हृदस्पर्शी सोहळा पार पडला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत यावलीत घरोघरी सुद्धा जन्मोत्सव सोहळा अर्थात हा ग्रामजयंती महोत्सव पहायला मिळला. जन्मोत्सवाच्या शुभ पर्वावर तुकडोजी महाराजांची जन्मभूमित गावकऱ्यांनी पहाटेच ग्रामस्वच्छता करून यावली हजारो लखलखत्या पणत्यांनी उजळून निघाली होती. दरम्यान तुकडोजी महाराज यांची जन्मभूमीवर देखील आकर्षक रोषणाई करण्यात आली.

Rashtrasant Tukdoji Maharajyavali