चातगाव ग्राम पंचायतीवर भाजपचे वर्चस्व

खा. अशोक नेते यांच्या हस्ते सरपंच/उपसरपंच यांचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ५ मार्च: गडचिरोली तालुक्यातील चातगाव ग्राम पंचायत निवडणूकित भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून सरपंच/उपसरपंचासह ग्राम पंचायत सदस्यही भाजपचे निवडून आले आहेत. खासदार अशोकजी नेते यांनी चातगाव ग्राम पंचायत ला भेट देऊन सरपंच, उपसरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आदिवासी मोर्चाचे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाश गेडाम, मिसेस इंडिया म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे नावलौकिक मिळविलेल्या मनीषा धनिरामजी मडावी, जि.प. सदस्य राजू जीवानी, धानोरा तालुका महामंत्री विजयजी उईके, धनिरामजी मडावी व अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच गोपालजी उईके, उपसरपंच  भूमिकाताई धुळसे, ग्राम पंचायत सदस्य गीताताई गोपाल उईके, रंजनाताई कोडाप, अनुसयाबाई मत्ते, सुनंदा गावळे, राजूभाऊ ठाकरे, राहुल बावणे, माणिकचंद कोवे इत्यादीचा खा. अशोक नेते, आदिवासी मोर्चा चे प्रदेश महामंत्री प्रकाशजी गेडाम, व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.