भाजपा कार्यालयातील पदाधिकाऱ्यांचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्य अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ११ एप्रिल: भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.      

  यावेळी भाजपा कार्यालयात खा. अशोक नेते यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी नगर परिषद चे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री संजयजी बारापात्रे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, झोपडपट्टी आघाडी चे श्यामजी वाढई, स्वीयसहाय्यक रविंद्र भांडेकर उपस्थित होते. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन केले.

ashok nete