ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर उतरणार – माजी राज्यमंत्री तथा आ. डॉ परिणयज फुके यांचे प्रतिपादन

भाजपच्या वतीने 26 ला जिल्ह्यात रस्ता रोको व जेल भरो आंदोलन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 22 जून : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीयते पणामुळे ओबीसी बांधव हवालदिल झालेला असून ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्णपणे बंद करण्याचा डाव राज्यातील आघाडीचे सरकार करीत आहे.

राज्य सरकारला धडा शिकविण्यासाठी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरणार असून 26 जून रोजी ठिकठिकाणी भाजपच्या वतीने धरणे आंदोलन व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा आम. डॉ परिणयजी फुके यांनी केले. काल दि. 21 जून रोजी साई मंदिर गडचिरोली येथे भारतीय जनता पार्टी च्या महत्वपुर्ण बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली ची महत्वपूर्ण बैठक आज दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य साई मंदिर, चामोर्शी रोड गडचिरोली येथे पार पडली.

बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉ परिणय फुके, खा.  अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजभे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजपचे जिल्हा महामंत्री ( संघटन) रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, गडचिरोली च्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, भाजयुमो चे प्रदेश सदस्य स्वप्नीलजी वरघंटे, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, जीपचे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, जिप महिला व बालकल्याण सभापती रोशनीताई पारधी, ओबीसी आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, जिल्हा महामंत्री भास्कर बुरे,व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा  :

आशा सेविकांनी आपले हक्क मागण्यांसाठी केले भीक मांगो आंदोलन!

नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

अन् बच्चुभाऊ कडू युसुफ खा पठाण बनतात तेव्हा…

 

 

lead storyMLA Dr. Parinay Phuke