ओबीसी राजकीय आरक्षण रद्द करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे एटापल्लीत चक्काजाम व जेलभरो आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

एटापल्ली : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा बाजु सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात असमर्थता झाले परीणामी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्थाचे ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. या विषयाचा अनुषंगाने भाजप ता. शाखा एटापली मध्ये संदिपभाऊ कोरेत यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन व जेलभरो आंदोलन करून राज्य सरकारचा तुघलकी कारभाराच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

या आंदोलनामध्ये बाबुरावजी गंपावार ता. अध्यक्ष भाजपा, जनार्धनजी नल्लावार ता. महासचिव भाजपा तथा उपसभापती पं. स. एटापल्ली, दिपक फुलसंगे ता. महासचिव भाजपा, प्रसादजी पुलूरवार ता महासचिव भाजपा, अशोकजी पुलुरवार जेष्ट नेते भाजपा, विजयजी नल्लावार जिल्हासचिव भाजपा, प्रशांतजी आत्राम सरपंच ग्रा.प. तोळसा तथा भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा सचिव, निखीलजी गादेवार युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांतभाऊ तेलकूंटलवार भाजपा सहकार आघाडी ता. अध्यक्ष, संपतभाऊ पैडाकुलवार युवामोर्चा ता. अध्यक्ष राकेशभाऊ तेलकुंटलवार, आनंदभाऊ बिश्वास प्रसिद्धी प्रमुख भाजपा, अशोकजी चकीनारपवार जेष्टनेते भाजपा, सुरेशजी कर्मे भाजपा दलीत आघाडी ता. अध्यक्ष, विजयाताई जंबोजवार भाजपा महीला आघाडी ता अध्यक्ष व मोठ्या संख्येने महीला व नागरिक उपस्थित होते. पोलीस विभागातर्फे संदिप कोरोत सह काही प्रमुख पदाधिकार्याना अटक करून थोड्या वेळात सुटका करण्यात आली.

हे देखील वाचा : 

गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडुन ४ गुन्हयातील जप्त ३२ किलो गांजा करण्यात आला जाळून नष्ट

केंद्र व राज्यसरकार शेतकरी विरोधी त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा  : संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन

ओबीसींना न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

Etapallilead storyobc reservation agitationsandip koret