रायगड जिल्ह्यात काळे धंदे पुन्हा सुरु

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

रायगड, 29 मे – रायगड जिल्हा हा अतिसंवेदनशीलकडे झुकताना दिसत आहे चो-या, दरोडे, खून, बलात्कार अशा विविध गुन्ह्यानी हा जिल्हा त्रस्त झालेला आहे जिल्हा पोलीस प्रशासनाचे अपयश म्हणायचे का?कुणीही उठावे काहीही करावे अशी भीषण परिस्थिती जिल्ह्यायात दिसून येत आहे.

माती माफिया कोॅरी माफियाचा धुडगूस सुरु असून त्यानी लावलेल्या विविध ठिकाणच्या डोगर द-यातील सुरुग स्फोटाचे आवाज जिल्हयामध्ये उमटत आहेत आणि नेमके हे आवाज प्रशासनातील संबंधित खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत का पोहचत नाहीत की यांनी जाणूनबुजून कानावर हात ठेवले आहेत, याचा विचार शासनाने केला पाहिजे मोठे मोठे डोगर भूईसपाट केले जात आहेत मातीची अवैध उत्खनन सुरु आहे अजून वाळूचा उपसा कुठे ना कूठे सुरु आहे नंदी पात्रात कुठलीही परवानगी न घेता टॅकर मालक पाण्याचा अवैध उपसा करत आहेत अशी सर्व परिस्थिती असताना दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्ती चोरी प्रकरणानंतर रायगड जिल्ह्यातील बंद व थंड पडलेले मटका, जुगार क्लब,पुन्हा जोशात सुरु आहेत, तसेच पनवेल तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि भिगारीपाडा नागरिक वस्तीतून जाताना कपल बार मध्ये क्लब सुरु आहे.

गावठी दारु विक्री आदी काळे धंदे पुन्हा एकदा सुरु झाले असून बारबालाचे नर्तनही विशेष बारमधून छुप्या रित्या सुरु आहे एकदरीत मागचाच चित्रपट पुन्हा एकदा नव्याने पाहण्याचे दुभोॅग्य जिल्ह्यातील जनतेच्या नशिबी दिसत आहे वरील सर्व काळ्या धंद्याच्या दुष्परिणामामुळे जनतेला रोज नव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ही काळ्याकुट्ट धंध्याची जिल्ह्याला लागणारी कीड आपल्या अधिकारी व कारवाईच्या फवारणीने कर्तव्य दक्ष जिल्हा पोलीस नष्ट करतील का?असा प्रश्‍न नागरिक करत आहेत.