स्टँप पेपरचा काळा बाजार ! 500 रुपये किमतीचा स्टॅप 700 रुपयांना, नागरिकांची लुट ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर : शासकीय कामासह, शैक्षणिक व विविध व्यवहारासाठी स्टँप पेपरची आवश्यकता असते. त्याशिवाय  शासकीय कामे व आर्थिक व्यवहार पूर्ण होत नाही. परंतु 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर रद्द झाल्याने नागरिकांची प्रचंड लुट होत आहे.

तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अधिकृत मुद्रांक विक्रेते  100 आणि 500 रुपयांचे स्टँप पेपरची काळाबाजारी करत आहे. स्टॅम्पपेपर उपलब्ध नसल्याचे सांगून 200 रुपये जास्त घेऊन त्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती नागरिकांकडून दिली जात आहे. 500 रुपयांचा स्टँप पेपर 700 रुपयांना विकला जात असून नागरिकांची मोठया प्रमाणावर लुट होत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख मनोज शाहू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने  निवासी उपजिल्हाधिकारी विनय खांडे यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावे निवेदन देऊन हा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई करून त्यांचे  परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे.  तसेच  तपासणी करून नागरिकांची लूट करणाऱ्या स्टॅम्पपेपर विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यासोबतच स्टँप पेपरचा पुरेसा पुरवठा प्रशासनाने करण्याची मागणी त्यांनी केली

शासकीय कामासह शैक्षणिक व विविध व्यवहारासाठी चालणारा 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर रद्द झाल्याने   सर्वसामान्यांना 500 रुपयांचा मुद्रांक खरेदी करावा लागत आहे. नोव्हेंबर महिन्यात अखेरचे 100 रुपयांचे अडीच हजार मुद्रांक विक्री करण्यात आले तर 500 रुपयांचे तब्बल साडेसहा हजार मुद्रांक विक्री झाले.

आधी  20, 50 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरच  शासकीय कामे व आर्थिक व्यवहार होत होती. कालांतराने हे दोन्ही स्टॅम्प पेपर बंद करून 100 रुपयांचा मुद्राक आणण्यात आला. या मुंद्राकावर विविध प्रतिज्ञापत्र, किरकोळ आर्थिक व्यवहार होत होते. तसेच मुद्रांकाचे हे दरही नागरिकांना रास्त व वाजवी वाटत होते. परंतु, महिनाभरापूर्वी 100 रुपयांऐवजी 500 रुपयांचा मुद्राक विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर होणारी कामे आता 500 रुपयांवर गेली असल्याने तसेच कालाबजारी होत असल्याने नागरिकत  कमालीची नाराजी पसरली आहे.

हे ही वाचा,

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा

कत्तलीसाठी नेणाऱ्या ११६ गोवंशाची केली सुटका !

‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;

भारतीय नारी सोनं ठेवणीच्या बाबतीत संपूर्ण जगात भारी!

 

अधिकृत मुद्रांक विक्रेते  100 आणि 500 रुपयांचे स्टँप पेपरची काळाबाजारी करत आहे.त्याशिवाय  शासकीय कामे व आर्थिक व्यवहार पूर्ण होत नाहीशासकीय कामासह शैक्षणिक व विविध व्यवहारासाठी चालणारा 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर रद्द झाल्याने   सर्वसामान्यांना 500 रुपयांचा मुद्रांक खरेदी करावा लागत आहेशैक्षणिक व विविध व्यवहारासाठी स्टँप पेपरची आवश्यकता