लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुल :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भर संसदेत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी अवमान केला. तसेच परभणी जिल्ह्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाची तोडफोड केली.
जेव्हा या विरोधात परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला तर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून बौद्ध वस्त्यांवरील भीमसैनिकांना बेदम मारहाण केली. एका सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला न्यायालयीन कोठडीत मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस बौद्ध समाजावर होत असलेला अन्याय व अमित शहासारख्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले जात आहेत यामुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड रोष व्यक्त केल्या जात आहे.
या घटनेचा जाहीर निषेध व विरोध करण्यासाठी मुल तालुक्यातील व शहरातील बौद्ध समाज बांधव यांच्याद्वारे दिनांक २४/१२/२०२४ ला सकाळी दहा वाजता ताडाळा रोड वरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बौद्ध समाज बांधवांचा तहसील कचेरीवर भव्य विराट मोर्चा निघणार आहे. सदर मोर्चाला जास्तीत जास्त बौद्ध समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध समाज बांधवांनी केले आहे.
हे ही वाचा,