लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 20 सप्टेंबर :- मुंबईत काल दिवसभर हवेत गारवा जाणवत होता. तापमान २३ अंशांपर्यंत खाली गेले होते. हा सप्टेंबरमधील खालावलेल्या तापमानाचा विक्रम ठरला आहे. यापूर्वी मुंबईत १९९४ मध्ये २३.८ हे सप्टेंबरमधील सर्वात कमी तापमान नोंद झाले होते. तर सर्वात कमी कमाल तापमान १९८७ मध्ये २५.७ नोंदविले गेले आहे. त्या अर्थाने १९६९ नंतर गेल्या ५३ वर्षांत कालचा दिवस मुंबईत सर्वाधिक गारेगार ठरला.
दिवसाचे कमाल तापमान गेल्या काही दिवसांत घसरले आहे. ते सरासरीच्या म्हणजे ३० अंश सेल्सिअस पातळीच्या खाली घसरलेले आहे. राज्यातली सध्याच्या ढगाळ हवामानामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. परतीचा मान्सून संपेपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असते. यामुळे सूर्यप्रकाश राहत नाही व पर्यायाने वातावरणातील उष्णता कमी राहते. त्यातून गारवा जाणवतो. अनेकदा तो अंगाला झोंबणारा, बोचरा अनुभव असतो.
४-५ दिवसांत पुणे शहरातील कमाल व किमान या दोन्ही तापमानात घट होत आहे. ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे तापमान कमी राहते. त्यामुळे रात्री-पहाटे थंडी वाढत असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यात येत्या ५ दिवसात कमाल तापमानाचा पारा ३०अंश सेल्सिअसपेक्षा कमीच राहणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर थंडी कायम राहण्याची शक्यता आयएमडी पुणे चे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी सांगितले.
हे पण वाचा :-